उमापुरच्या उर्दू शाळेत बीड चा शिक्षक;निवड प्रक्रीया चूकीची

ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा

गेवराई दि 1 ( वार्ताहार ) राज्य शासनाने सुशक्षीत बेरोजगार यांना प्रक्षिणार्थी सहा महिणे शाळेवर नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत तसेच स्थानिक पातळीवर यांचे नियम अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत तसेच यामध्ये उच्च शिक्षण याला प्रधान्य द्यावे तसेच स्थानिक उमेदवार असायला हवा परंतू उमापुरच्या जिल्हा परिषद शाळेत हे सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत तसेच उर्दू विभागात चक्क बीड चा शिक्षक भरती केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या निवड प्रक्रीया फेर करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी डीएड, बीएड, पदवी प्राप्त झालेल्या युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी नियमांच्या अधीन न राहता मनमानी कारभार करून जिल्हा परिषद शाळेत लक्की ड्रा करून नियुक्त्या केल्या असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या एका शाळेत गावातील रहिवासी वगळून जवळील संपर्कात असलेल्या चक्क बीड येथील रहिवाशाचा अर्ज स्विकार करून भरती केली आहे. हा प्रकार गेवराई तालुक्यातील उमापूर येथील उर्दू शाळेत उघडकीस आला आहे. यामुळे खऱ्या उमेदवारांना यापासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने व काही ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळविले आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना व गावातील युवकांना न कळवता ही भरती करून बीड येथील रहिवाशाचा शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उमापूर या गावातील नागरिक व युवकांना न कळवता ही भरती केल्याची सांगितले जात आहे. ही झाल्याली भरती रद्द करून नव्याने नियुक्ती करावी यासाठी गेवराईच्या गट शिक्षणधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.ही झालेली नियुक्ती रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद माध्यमिक मुख्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीने दिला आहे.संतोष राऊत, संभाजी वीर, रामेश्वर दांगट, मुबारक शेख, राजु लोखंडे, दादासाहेब बनसोडे, बाबुभाई शेख, राजाभाऊ राऊत, रमेश कापसे विनोद कापसे, यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *