कार्यवाई करत असतांना तहसिलदार यांना माफियाची दादागिरी
गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू
गेवराई दि 23 ( वार्ताहार ) गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे हे अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत असतांना गेवराई शहरातील बायपास जवळ तसेच दतराज पार्क जवळ एक हायवा वाळूने भरून चालला होता त्यांनी त्याच्यांवर कार्यवाई करत तो ताब्यात घेत असतांना त्यांच्या समोर गाडी अडवी लाऊन गाडी सोडा म्हणत एका वाळू माफियांनी तहसिलदार संदिप खोमणे दादागिरी केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याची घटना ( दि 23 ऑगस्ट ) रोजी रात्री 11 वाजता घडली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात रात्रीच्या वेळी काही ठराविक अवैध वाळू वाहतूक करनाऱ्या हायवा सुरू आहेत तसेच गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे हे आपल्या पथका सोबत गस्त घालत असताना गेवराई बायपासवर त्यांना एक हायवा वाळूने भरून भरगाव वेगात जात असतांना त्यांनी पाठलाग करून सदरचा हायवा पकडला तसेच ही कार्यवाई करत असतांना हायवा समोर एक चार चाकी गाडी अडवी लाऊन तहसिलदार यांना गाडी सोडा म्हणून एका वाळू माफियांनी दादागिरी केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केली असल्याची घटना घडली असून गेवराई पोलिसांत तहसिलदार संदिप खोमणे यांच्या फिर्यादी वरूण गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे तसेच या कार्यवाईत एक हायवा तहसिल कार्यलयात लावण्यात आला असून 22 लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.