उत्कृष्ट कामगिरी बद्दल तहसिलदार संदिप खोमणे सन्मानित
गेवराई दि 16 ( वार्ताहार ) गेवराई महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांना स्वातंत्रदिनी सन्मानित केले आहे व पालक मंत्री धंनजय मुंडे व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून त्यामधील अंतर्भूत कलम 20 च्या पोटकलम (3) व (5) च्या अनुषंगाने द्वितीय अपील प्राधिकारी यांच्या स्तरावरुन संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कार्याचे मुल्यमापन करण्यात आलेले आहे. बीड जिल्हयातील पदनिर्देशित अधिकारी यांचे 100 टक्के पात्र प्रकरणात विहित कालावधीत कार्यवाही केली असल्याचे पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुषंगाने (दि.15 ऑगस्ट 2024) रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हयाच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते कलम 20 (5) नुसार खालील दिलेल्या तकत्यामधील उप विभागिय अधिकारी,तहसिलदार,नायब तहसिलदार व पदनिर्देशित अधिकारी यांचा याथोचीत सन्मान प्रशस्तीपत्र देवून व तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात त्याबाबत नोंद घेण्याचे ठरले आहे.त्या अंनूषगाने गेवराई महसूल विभागात अतिषय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तहसिलदार संदिप खोमणे यांना पालकमंत्री धंनजय मुंडे व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...