गेवराई दि 14 ( वार्ताहार ) परराज्यातून चोरी गेलेले वाहने ट्रॅक्टर किंवा हायवा असे वाहने वाळू उपसा करण्यासाठी व त्याव्दारे अनाधीकृत वाहतूक केली जाते तसेच सर्रास ही वाहने रोडवर फिरत असतात अनेक गून्ह्याचा छडा लावणारे स्थानिक गून्हे शाखा व आरटीओ चे अधिकारी हे मात्र गाढ झोपेतच आहेत.या प्रकरणी पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात अवैध वाळू तस्करी फोफावली आहे यामध्ये जी वाहने व सामग्री वापरली जाते ती पर राज्यातील चोरीची आहे अशी माहिती आहे शंभर रुपयांच्या बॉन्डवर नोटरी करूण करार केला जातो तो पण बनावट आहे असे किमान तिनशे ते चारशे वाहने आहेत याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही अनेक दाखल झालेल्या गून्ह्यात तपास अधिकारी यांना अनेक अडचणीचा सामना करावा करावा लागतो शेवटी आरोपी या गून्ह्यातून निर्दोष होतात परिणामी आरोपीवर कायद्याचा वचक राहत नाही तालुक्यात वाळू उपसा करनारी वाहने ही कार्यवाईच्या भितीने नेहमी अनोखी शक्कल लावतात कायद्याच्या कचाट्यातून पळ काढण्यासाठी आता नविन शक्कल वापरली जाते यांची टोळी गेवराई शहरात सक्रीय आहे स्थानिक गून्हे शाखा व आरटीओच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे चित्र पहायवयास मिळत आहे तसेच गून्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जन सामान्यातून होत आहे.