गेवराई दि 14 ( वार्ताहार ) तालुक्यातील आगर नांदूर तसेच नागझरी परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर गेवराई महसूल प्रमुख संदिप खोमणे यांनी कार्यवाई केली असून अंदाजे आठ लक्ष रुपयांचा मुद्देमाल या कार्यवाईत जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,जूनी नाकझरी तसेच आंगर नांदूर या ठिकाणा वरूण अवैध वाळू उत्खनन करूण त्यांची ट्रॅक्टर च्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे अशी माहिती गूप्त बातमी दाराने तहसिलदार संदिप खोमणे यांना दिली तसेच त्यांनी या परिसरात जाऊन दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेत तहसिल कार्यलयात लावण्यात आले आहेत सदरच्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाई करणार असल्याचे देखील तहसिलदार संदिप खोमणे यांनी सांगितले आहे.