तहसिलदार यांच्यावर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद पठाण चा अटकपुर्व जामिन फेटाळला
पोलिस अधिक्षक साहेब जावेदला अटक करण्यासाठी गेवराईच्या खाकीत दम नाही
गेवराई दि 14 ( वार्ताहार ) गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांच्या सह पथकावर हल्ला करण्यात आला होता तसेच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जावेद पठाण हा अद्याप फरारच आहे गेवराई पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी कसलेही प्रयत्न केलेले नाहीत तसेच बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन साठी अर्ज दाखल केला होता त्यावर ( दि 13 ऑगस्ट ) रोजी अंतिम युक्तीवाद दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बीड जिल्हा सत्र वर्ग तिसरे न्यायमुर्ती यांनी आरोपी जावेद पठाण यांचा अर्ज फेटाळला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या दोन महिन्यापुर्वी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे आपल्या पथकासोबत गस्त घालत असतांना त्यांनी एक हायवा पकडला होता तसेच या हायवा संबंधी आरोपी जावेद पठाण यांनी आपल्या काही सहकाऱ्या सोबत तहसिलदार यांच्यावर जिवघेना हल्ला चढविला होता महसूल प्रशासनाच्या वतिने याच्यां निषेधार्थ पाच दिवस लेखणीबंद आंदोलन केले होते परंतू गेवराईच्या पोलिस प्रशासनावर यांचा काहीही परिणाम झालेला नाही तसेच उलट आरोपी जावेदला जामिन मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत अशी चर्चा आहे एका न्यायदंडाधिकारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या जावेदला अटक करण्यासाठी गेवराईच्या खाकीत दम नाही तसेच त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन साठी अर्ज दाखल केला होता परंतू त्यांचा अटकपुर्व जामिन फेटावळला आता तरी गेवराई पोलिस याला अटक करण्याची हिंमत दाखविणार का?असा प्रश्न उपस्थित होत असून जावेदला अटक करण्यासा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी गेवराई पोलिसांना कानमंत्र देऊन कायदा व सुवेस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या जावेदला बेड्या ठोकून कायद्या वचक ठेवावा अशी मागणी गेवराई महसूल कडून करण्यात येत आहे.