गेवराई दि 12 ( वार्ताहार ) वाळू माफिया काय?शक्कल लावतील याला काही नियम नाही तसेच दिवसा वाळू उपसा केला तर बोभाटा होतो म्हणून आता शहागडच्या दोन्ही पुलाखाली रात्रीच्या केन्या टाकून बेसूमार वाळू उपसा केला जात आहे तसेच या पुलाखाली भागवतराज आहे यावर आवर घालून पोलिस व महसूल प्रशासनाने यांच्यावर कार्यवाई करणे अपेक्षीत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील शहागड जवळच्या पुलाखाला दहा ते पंदरा केन्याव्दारे वाळू उपसा केला जात आहे स्थानिक तलाठी यांच्याकडे गावकरी यांनी अनेक तक्रारी केल्या परंतू सदरचा वाळू उपसा बंद होत नाही तसेच रात्रीचा वाळू उपसा करण्याची ही पहिलीच वेळ आहे तसेच पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाने सदर ठिकाणी छापा मारून कार्यवाई करण्याची गरज आहे दररोज लाखों रूपयांच्या महसूलवर भागवतराज डल्ला मारत आहे वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे व याठिकाणी कार्यवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.