बीड दि 7 ( वार्ताहार ) बीडचे पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती गून्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अविनाश बारगळ यांची बीड पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती मिळाली आहे तसेच राज्य शासनाने आज 4 वरिष्ठ पोलिस अधिक्षक यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी गेल्या दोन वर्षापासून जिल्हाचा कारभार हा व्यवस्थित रित्या संभाळला आहे तसेच कायदा व सुवेस्था याला कूठेही बाधा येऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख बीड जिल्ह्याने पाहिली तसेच आज राज्य शासनाने चार वरिष्ठ पोलिस अधिक्षक यांच्या बदलीचे आदेश काढले तसेच अमरावरती गून्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अविनाश बारगळ यांची बीड पोलिस अधिक्षपदी नियुक्ती केली आहे तसेच पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांना अद्याप पदस्थापणा मिळालेली नाही