गूटखा प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू ;61 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 24 ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी एक गुटख्याचा ट्रक बीड जालना रोडवरुण जात असतांना एका नेत्याने तो ट्रक अडविला व त्यांच्या मालकाला खंडणी मागितली तसेच या प्रकरणात तोडपाणी न झाल्याने हा ट्रक पोलिसांच्या स्वाधीन केला तसेच पोलिसांच्या ट्रक ताब्यात घेण्याच्या आगोदर एक पोलिस कर्मचारी यांने व नेत्याने संगणमत करूण या ट्रक मधून 20 पोते काढून घेतले असल्याची माहिती आहे तसेच दोन दिवसानंतर या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकारी व पोलिस यांनी संयुक्त पंचनामा केला असून या प्रकरणी गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.तसेच या कार्यवाईत ट्रक सह 61 लाखं 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीडच्या एका गूटखा व्यापाऱ्याचा ट्रक बीड जालना रोडवरूण जात असताना ती पकडली तसेच त्यातील 20 पोते गूटखा काढून घेतला असल्याची माहिती असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी देखील सहभागी होता तसेच गेवराई शहारातून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात गूटख्याची ट्रक जाते ही माहिती पोलिसांना माहिती नसावी का?तसेच पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करायच्या आगोदर गून्हा दाखल करूण हातवरी केली केले आहेत तसेच पाढंरवाडी शिवारात ब्रिजच्याखाली पोलिसांना ट्रक बेवारस सापडली तसेच दोन दिवस लोटूनही गेवराई पोलिसांना यांचा वारस सापडलेला नाही ही शोकांतिका आहे तसेच या ट्रक मधून काढून घेतलेला गूटखा माजलगावच्या व्यापाऱ्याला कुणी?विकला याचा शोध देखील पोलिसांनी लावला नाही तसेच बीडचा प्रसिद्ध गूटखा व्यापारी सन्नाउल्ला ईनामदार?यांची ही ट्रक असल्याचे बोलले जात आहे तसेच या प्रकरणाची पायेमुळे सोधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास करावा व हे रॅकेट उघड करावे अशी मागणी होऊ लागली आहे.