नीरज राजगूरू यांचा दणका;हद्दपारीसाठी बजावल्या गून्हेगार यांना नोटीसा

चकलांबा ठाणे हद्दीतील पाच तर गेवराई ठाण्याचा एक प्रस्ताव

 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत दहशत माजवणे तसेच वारवार कायदेशीर कार्यवाई करूण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अश्या सहा जणांविरूद्ध गेवराई व चकलांबा यांच्या ठाणे प्रमुखांनी हद्दपारीचे सहा प्रस्ताव उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत तसेच यांच्यावर अंतिम मंजूरीसाठी हे प्रस्ताव पाठवले जाणार असल्याची माहिती असून या संदर्भात नोटीस आल्याने गून्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, परिसरात दहशत माजवणे,जबरी,चोरी,खूनाचा प्रयत्न करणे अश्या गंभीर स्वरूपाचे गून्हे यांच्यावर दाखल आहेत तसेच आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्याला प्रत्येक वेळी पोलिस प्रशासनाकडून सक्त ताकिद करण्यात येत होती परंतू तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होणे व कायदा व सुवैस्था बिघडवणे वेगवेळे गून्हे त्यांच्याकडून घडत होते याच प्रमुख कारणामुळे त्यांच्यावर ही हद्दपार करण्यासाठी ठाणे प्रमुखांना गेवराई उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिल्या होत्या अश्या कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 ( 1 ) ( अ ) अन्वे बीड जिल्हाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात का? येऊ नये तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे शिफारस का? करू नये या संदर्भात अश्या प्रकारची नोटीस बजावण्यात आली असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्या या कार्यवामुळे गून्हेगार यांचे धांबे दणानले आहे.तसेच हे प्रस्ताव लवकरच बीड पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे अंतिम मंजूूरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *