जिल्हाधिकारी यांच्या नंतर पोलिस अधीक्षक यांच्या कार्यवाई कडे लक्ष
वादग्रस्त ठाणेदार यांची होणार उचलबांगडी ?
गेवराई दि 5 ( वार्ताहार ) जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या कार्यवाईमुळे गेवराई महसूल प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे तसेच आता पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर ही वादग्रस्त ठाणेदार यांची उचलबांगडी करणार असल्याची माहिती असून चकलांबा ठाणेदार या यादीत प्रथम क्रंमाकावर असल्याचे देखील बोलले जात आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त होत्या तसेच बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच त्यांनी राक्षसभूवन चे मंडळ अधिकारी व तलाठी यांना थेट निलंबीत केले तसेच महसूल बरोबरच सर्वांत जास्त वाळू माफियांना चकलांबा पोलिस ठाणेदार यांचे सहकार्य असते याठिकाणच्या ठाणेदार यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा संपुर्ण वरिष्ठ पातळीवर सुरू आहे पदभार गेलाही नाही तर चकलांबा पोलिस ठाणे मिळवण्यासाठी गेवराईच्या दोन अधिकारी हळद लाऊन पिवळे झाले आहेत तसेच बीड जिल्ह्यात ज्याला प्रभू वैद्यनाथांचे आर्शिवाद असतील तोच चकलांब्याचा ठाणेदार होईल अशी देखील माहिती परंतू अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी ठाणेदार यांचे वाळू माफियासोबत संबंध उघडकीस होत असल्याने बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर देखील वादग्रस्त ठाणेदार यांची उचलबांगडी करणार असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...