वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने शालनबाई शेषराव नजन वय 65 यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय 40 तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय41 असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...