गेवराई दि 27 ( वार्ताहार ) शहरातील जूने बसस्थानक परिसरात एका लॉजवर मॅनेजर व मालक यांच्या कडून एक महिला सोबत घेऊन देहविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच त्यांनी याबाबद खात्री करून डमी ग्राहक पाठवून सदरच्या लॉजवर छापा मारला असता एक महिला व मालक व मॅनेजर यांना ताब्यात घेऊन या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील जूने बसस्थानक परिसरात लक्ष्मी लॉजवर मालक व मॅनेजर एका महिलेकडून देहविक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक मिना तूपे यांना मिळाली तसेच त्यांनी सदर बातमी खात्रीलायक असल्याने गेवराई उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरु यांना याबाबद माहिती दिली व सापळा कार्यवाई करूण छापा टाकण्याची परवानगी मागितली तसेच या खात्रीलायक बातमी वरूण गेवराईचे उपविभागिय अधीकारी नीरज राजगूरू यांनी आपल्या खात्रीसाठी दोन पोलिस सिव्हिल ड्रेस मध्ये पाठवले व त्यांच्याकडे प्रत्येकी एक हजार रूपये दिले ठरल्या प्रमाणे पोलिसांनी सदर मालकाकडे व मॅनेजर कडे महिलेची मागणी केली असता त्यांने वरती जायला सांगितले व दरवाजा वाजवला असता एका महिलेने दरवाजा उघडला व गेवराईचे उप विभागीय अधीकारी नीरज राजगूरु यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता गांधी नगर बीड येथील महिला लॉज मालकांच्या व मॅनेजरच्या सांगण्यावरून हे करत असल्याचे माहिती या महिलेने पोलिसांना दिली असून या दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,पोउपनि मिना तूपे,सफो वाळके,पोशी बहिरवाल,पोना मुळे,एसी उगले चापोशी नेवडे चापोशी कूडके यांनी केली आहे.