पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे अद्याप फरारच

अटक करण्यासाठी पथके रवाना एसीबी सुत्रांची माहिती

 

बीड दि 16 ( वार्ताहार ) जिल्ह्याच्या पोलिस दलात खळबळ उडविनारी घटना रात्री उघडकीस आल्यानंतर एक कोटी रूपये लाच प्रकरणी आज पहाटे याबाबद गून्ह्याची नोंद झाली असल्याची माहीती असून जो अर्थिक गून्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे या प्रकरणात सक्रीय आहे तो अद्याप फरारच आहे त्याला आज अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत तसेच आज खाडेंच्या मुसक्या एसीबी आवळणार असल्याची माहिती असून हरीभाऊ खाडे यांचे घर बंद आहे ते ही सिल करण्यात आले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,माँ जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात दाखल असलेल्या गून्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल एक कोटीची मागणी अर्थिक गून्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांनी केली होती तक्रारदार यांनी यांची तक्रार बीड लाचलूच प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर जाधवर नावाच्या जमादार यांच्यावर बीड एसीबीने जाळे टाकले तसेच ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी अर्थिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे हे रजेवर होते तसेच त्यांनी लाचेची रक्कम एका खाजगी ईसमाकडे ठेवण्याचे फोनवर सांगितले तसेच ही कार्यवाई केल्यानंतर बीड एसीबीचे पथक पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या बळीराजा कॉम्प्लेक्स चाणक्यपूरी याठिकाणी गेले असता त्यांचे घर बंद होते तसेच बीड एसीबीने सदरच्या घर सिल केले आहे आज न्यायालयात दोन आरोपींना हजर करण्यात येईल त्यावेळी पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांच्या घराची झडती घेण्याची परवानगी न्यायालयाकडे एसीबी मागणार आहे तसेच उद्याप फरार असलेले पोलिस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली असून त्यांच्या घरात घबाड सापडते की काय?हे लवकरच स्पष्ट होईल.तसेच या प्रकरणात आरोपींची संख्या वाढेल का?हे देखील पहाणे महत्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *