अचार संहीतेच्या काळात अवैध वाळू उपस्याला लागत नाही ब्रेक
उप विभागिय पोलिस अधिकारी नावालाच
गेवराई दि 3 ( वार्ताहार ) तालुक्यातील चंकलाबा आणि तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत अचार संहीता काळातही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे याला वरीष्ठ पातळीवरूण ब्रेक लागत नाही तसेच उपविभागिय नीरज राजगूरु यांचा या दोन्ही ठाण्यावर वचक नाही असे सध्यातरी दिसून येत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील गंगावाडी,राजापूर,तसेच चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षसभूवन,गूंतेगाव,पाथरवाला या परिसरात अचार संहीता कार्यकाळात देखील अवैध वाळू उपसा जोमात आहे वरिष्ठांनी नेमलेले भररी पथके यातील नेमणूक केलेले अधीकारी कर्मचारी हे देखील वसूली अधीकारी आहेत यामुळे या पथकावर देखील संशय व्यक्त केला जात आहे एकीकडे जिल्हा महसूल प्रशासन अचार संहीतेचे पालन करण्याच्या सुचना देत असतानाच चकलांबा आणि तलवाडा पोलिस ठाणे यांचे दोन्ही प्रभारी यांची पायमल्ली करत असताना दिसून येत आहे गोदाकाठचा मतदार अवैध वाळू उपस्यामुळे हवालदिल आहे अनेक गावे मतदानावर भहीष्कार टाकण्याच्या मनस्थित आहे उप विभागीय पोलिस अधीकारी यांचा या दोन्ही ठाण्यावर अंकूश नाही वरिष्ठाचे सक्त आदेश असतांना देखील त्या आदेशाला न जूमानता हा सगळा प्रकार सुरू आहे या काळात जर हा प्रकार बंद झाला नाही तर आदर्श अचार संहीता भंग होऊन याला गालबोट लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.