वाळू माफियांनी नाही तर अधिकाऱ्यांनी केला गेवराई तालूका बदनाम
गोदापात्र तूमच्या बापाची जाहागिरी आहे का? रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंतच वाळूची वाहतूक सुरू ठेवायला
गेवराई दि 25 ( वार्ताहार ) बीड लोकसभा निवडणूसाठी आदर्श अंचार संंहिता सुरू आहे याच पालन कोण? करतंय आणि भंग कोण?करतंय यांचा विचार व्हायला हवा गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन,म्हाळजपिंपळाव सावळेश्वर,या आदी भागातून गेल्या महिना भरापासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाळू उपसा सुरू आहे याला कुनाचा आर्शिवाद आहे अनेक अधिकारी गेवराईला फक्त वाळूचा मलिदा लाटण्यासाठीच येतात का?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.तसेच आपल्या बापाची जहागिरी असल्याप्रमाणे टाईम टेबल देऊन वाळू उपस्याला परवानगी दिली कूणी?गेवराई तालुका वाळू माफियांनी नाहीतर अधिकाऱ्यांनीच बदनाम केला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,वाळू हा विषय गौणखनिज अधिकारी तसेच महसुलचे तहसिलदार यांच्या अदीपत्याखाली येतो पोलिसांना वाळूची गाडी पकडण्याचा अधिकार नाही परंतू चोरीचे कारण समोर देत पोलिसांचा वाळू प्रकरणात हस्ताक्षेप असतो महसूल तर लांबच पण आधी पोलिसांना भेटावे लागते ही वास्तूस्थिती आहे गेवराई तालुका हा वाळू माफियांनी नाही तर अधिकारी यांनी बदनाम केला आहे दररोज या तालुक्यातून वाळूचे हिशोब पकडला तर करोडो रुपयांचा महसूल पोलिस आणि महसुलचे कर्मचारी यांच्या साक्षीने व परवानगीने चोरला जातो गोदापात्र ही कूनाच्या बापाची जाहिगिरी आहे का? काही गावांत तर चक्क सामान्य नागरिकांना रस्त्यावरून वागू देत नाहीत अनेक ठिकाणी वाळूच्या गाडीने झालेल्या अपघातात मयत झालेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे संरार उद्धवस्त झाले आहेत तालूक्यातील प्रस्तापिताना राजकारण करायचे असल्याने त्यांचे बगलबच्चे यात असल्या कारणाने याविषयी आवाज उठवत नाहीत अशी चर्चा आहे काही मंडळी चक्क स्वत:च्या स्वार्थासाठी हम करे तो कायदा अश्या अभिरभावात वावरत आहेत कायद्याचे रक्षक असल्याचे भासवतात तसेच काही जूनियर कर्मचारी हे सुद्धा कार्यशून्य आहेत परंतू आम्ही फार ज्ञानी असल्याचे भासवतात महसूल मधिल कर्मचारी हे वाळू तस्करी रोखू शकत नाहीत त्यांच्याकडे अपूरे मनुष्यबळ आहे आणि कार्यवाया करण्यास सक्षम देखील नाही पोलिसांचा मुद्दा आला तर ते सांगतात कायदा आम्हाला वाळू पकडण्याची किंवा गाडी अडवण्याची परवानगी देत नाही त्यामुळे तेरी बी चूप आणि मेरी ही चूप अश्या पद्धतीने टाईम टेबल देऊन आदर्श आचार संहितेचा भंग करून कायदा व सुवैस्थेचे तिन तेरा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून वरिष्ठ अधिकारी यांना आपले कार्यलय सुटत नाही तसेच गेवराई तालुक्याच्या एक प्रमुख पदावर मुक्के वरिष्ठ अधिकारी बसले आहेत ते कधीच कुनाला काही बोलत नाहीत अशी असनारी परिस्थिती तालुक्यात निर्माण झालेली आहे.