आरोपी विरूद्ध गून्हा दाखल; 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावरून अवैध वाळू वाहतूकीची माहीती गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांना गूप्त बातमीदाराने दिली तसेच सदर ठिकाणी हायवेवर तात्काळ पोलिस पथक पाठवून तिन हायवा वाळूने भरलेल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच ही कार्यवाई आज ( दि 20 एप्रिल ) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की नायरा पेट्रोल पंपाजवळ अनाधीकृत वाळू घेऊन तिन हायवा चालल्या आहेत अशी माहिती गेवराई पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांना मिळाली तसेच सदर ठिकाणी पोलिस पथकाला कार्यवाईचे आदेश दिल्यानंतर सदरच्या हायवा पाठलाग करून गेवराई पोलिसांनी पकडल्या आहेत तसेच या प्रकरणी तिन आरोपी विरूद्ध गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच या कार्यवाईत 1 कोटी 20 लाख 54 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी डॉ नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिस ठाणे प्रमुख प्रविणकूमार बांगर,सपोनि संतोष जंजाळ,पोउनि अशोक शेळके,पोउपनि शिवाजी भूतेकर,पोह रामनाथ उगलमुगले,एएसआय सुरेश पारधी,पोह संजय सोनवणे,पोह सरवदे,पोशी शेखर हिंगावार,यांनी केली आहे.