January 22, 2025

सुरळेगावात चकलांबा पोलिसांचा छापा

47 लाखांचा मुद्देमाल जप्त;सपोनि नारायण एकशिंगे यांची कार्यवाई

गेवराई दि 19 ( वार्ताहार ) तालुक्यातील सुरळेगाव परिसरात अवैध वाळू उपसा करून त्यांची बेकायदेशीर तस्करी सुरू असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली त्यावरून सदर ठिकाणी छापा टाकला असता एक हायवा,रोटर,एक ट्रॅक्टर,एक मोटारसायकल असा एकूण 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरची कार्यवाई ही ( दि 19 एप्रिल )रोजी सकाळी सातच्या दरम्यान करण्यात आली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे यांना गूप्त बातमीदाराने माहीती दिली की सूरळेगाव परिसरातील गोदापात्रात अवैध विना परवाना वाळूची वाहतूक सुरू आहे सदर ठिकाणी गोदापात्रात सकाळी सातच्या सुमारास छापा मारला असता एक हायवा ,रोटर ,ट्रॅक्टर,मोटार सायकल असा 47 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासुन चकलांबा पोलिस ठाणे प्रमुख यांनी कार्यवाईचा धडका लावला आहे अवैध धंदेवाल्याचे या हद्दीत धाबे दनालले आहेत सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागिय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखीली चकलांबा पोलिस ठाणे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे ,पोउपनि अनंता तांगडे,पोउपनि रामेश्वर इंगळे ,पोकॉ कैलास खटाणे,पोकॉ सुरवसे, पोकॉ तूकाराम पौळ,पोकॉ घोंगडे,चालक सानप आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *