January 22, 2025

चकलांबा पोलिसांनी सापळा लाऊन एक लाखांची दारू पकडली

चार आरोपी विरूद्ध गून्हा;सपोनि नारायण एकशिंगे यांची सिंगम कार्यवाई

 

गेवराई दि 18 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची तस्करी होणार आहे अशी माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे यांना मिळाली होती तसेच गूप्त बातमीदाराच्या सांगण्यावरून चकलांबा ठाणे हद्दीत तिन वेगवेळे पथक तयार करून ही एक लाखांची देशी दारू चकलांबा पोलिसांनी पकडली आहे तसेच उमापूर परिसरात मोटार सायकल वर गोमांस विक्री करण्यासाठी जात असनाऱ्या एकाला देखील ताब्यात घेऊन गून्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाई ही( दि 17 एप्रिल रोजी ) करण्यात आली आहे.

याबाबद सविस्तर मााहिती अशी की,गेवराई ते महार टाकळी रोडवर मोठी दारूची तस्करी केली जानार आहे अशी माहिती खात्रीलायक बातमीदाराने चकलांबा पोलिस ठाणे प्रमूख नारायण एकशिंगे यांना दिल्यानंतर त्यांनी तिन वेगवेळे पथके तयार करू महारटाकळी चेकपोस्टवर नाकाबंदी तसेच संशय असनाऱ्या व्यक्ती च्या झडती सुरू केली यामध्ये हॉटेल निवांत खळेगाव,उमापूर ते चकलांबा रोडवर एक ईसम आणि महार टाकळी चेकपोस्टवर अश्या तिन ठिकाणावरून आरोपी (1) कृष्णा वामन कांबळे राहणार खळेगाव ,(2) भगवान सिताराम रोकडे राहणार उमापूर,(3)शरद श्यामसुंदर कापसे राहणार उमापूर (4)जब्बार अहेमद कूरेशी राहणार उमापूर याला गोमांस तस्करी करत असतांना रंगेहात पकडले आहे वरील तिन आरोपी कडून एक लाखं रूपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली आहे तसेच यासह गून्ह्यात वापरलेल्या चार मोटारसायकल ही जप्त करण्यात आल्या असून या चार आरोपी विरूद्ध चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागिय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,चकलांबा ठाणे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंता तांगडे,पोउपनि कूमावत,पोउपनि रामराव इंगळे,पोह अमोल येळे,पोह पवार,पोकॉ घोंगडे,पोकॉ मिसाळ,पोकॉ तूकाराम पौळ, पोकॉ सुरवसे,पोकॉ खटाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *