राक्षसभूवनमधून दोन हायवा ताब्यात;42 लाखांचा मुद्देमाल जप्त
आयपीएस धीरजकूमार बच्चू यांच्या पथकाची कार्यवाई
गेवराई दि 16 ( वार्ताहार ) तालूक्यातील राक्षसभूवन परिसरात अवैध वाळूचे उत्खनन केले जात असल्याची माहिती आयपीएस डॉ धीरजकूमार बच्चू यांना मिळाली सदर ठिकाणी पथक पाठवून दोन वाळूने भरलेल्या हायवावर कार्यवाई करण्यात आली असून ही दोन्ही वाहने जप्त करून गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत.तसेच ही कार्यवाई ( दि 16 एप्रिल ) रोजी करण्यात आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन याठिकाणावरून अवैधरित्या वाळूने भरून घेऊन जाऊन त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच राष्ट्रीय महामार्ग बीड जालना रोडवर वाळू माफियांनी हौदोस घातला असल्याची गूप्त माहिती आयपीएस धीरजकूमार बच्चू यांना देण्यात आली सदरची माहिती यांची शहानिशा करून कायदेशीर कार्यवाई करण्याच्या सुचना त्यांनी पथकाला दिल्या त्यावरून गेवराई तालूक्यातील राक्षससभूवन येथून वाळूने भरून चाललेले दोन हायवा क्रं सीजी 07 सीसी 6419व एम एच 20 एफजी 6322 ह्या बीड जालना रोडवर छ संभाजीनगर कडे जानाऱ्या हायवेवर मोठ्या शिताफितीने पकडल्या आहेत तसेच या कार्यवाईत 41 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाई सूरु आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ धीरजकूमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोह देशमुख,पोकॉ कानतोडे,पोकॉ मिसाळ,पोकॉ चव्हाण,पोकॉ चव्हाण यांनी केली आहे.