नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आणखी एका डीजेवर चकलांबा पोलिसांची कार्यवाई
चालक मालकावर चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल
गेवराई दि 13 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील मारोतीची वाडी परिसरात विना परवानगी तसेच नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आणखी एका डीजेवर चकलांबा पोलिसांनी कार्यवाई केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे अर्तगत उमापूर पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये मारूतीची वाडी परिसरात विना परवाना डीजे वाजत असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे यांना दिली तसेच सदर ठिकाणी उमापूर पोलिस यांना कार्यवाईचे आदेश त्यांनी दिले तसेच उमापूर येथील पोलिसांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी केली व खातरजमा केली असता डीजे क्रं एम एच 04 एफ डी 7073 हा डीजे मोठ्या डीसेबल आवाजात वाजत होता तसेच रहदरीच्या रस्त्यावर असल्याने येनाऱ्या जानाऱ्या नागरिकांना यांचा प्रचंड त्रास होत असल्याने पोलिसांनी या डीजेवर कार्यवाई केली आहे तसेच पोलिस आल्याचे लक्षात येताच डीजेच्या चालकांने पलायन केले तसेच या डीजे चालक आणि मालक यांच्याविरूद्ध गून्हा दाखल केला असून या आठवड्यात चकलांबा पोलिसांची डीजेवर दूसरी कार्यवाई आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यास अश्या डीजेवर कार्यवाई करण्यात येईल.असे चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमूख सपोनि नारायण एकशिंगे यांनी सांगितले आहे