तलवाड्यात तरूणाला चिरडनारा तो ट्रक वाळूचा 

चालकांसह मालकांवरही सदोषमनूष्य वधाचा गून्हा दाखल करा 

गेवराई दि 2 ( वार्ताहार ) एममिनार मस्जित मधून नमाज अदा करूण बगेवाडीला जानाऱ्या एका मुस्लीम युवकाला एका ट्रकने समोरून जोराची घडक दिली असल्याची घटना आज ( दि 2 एप्रिल ) रोजी दूपारी घडली असून तलवाडा पोलिसांनी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, युनूस शेख ( वय 32 वर्ष ) राहणार बगेवाडी तालूका गेवराई जिल्हा बीड असे या अपघातात मयत झालेल्या तरूणांचे नाव असून तलवाड्यात दूपारची नमाज अदा करायला हा तरूण आला असल्याची माहिती असून तसेच एम एच 23 डब्ल्यू 9400 असा या बारा टायर ट्रक चा क्रंमाक असून सदरची गाडी ही वाळूवर चालत असल्याची माहिती असून हीचा मालक नेकनूर याठिकाणचा आहे व तो तलवाडा पोलिसांची संबंधीत आहे सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून सदरचा चालकाने मद्यप्राषन केले असल्याचे दिसून आले असून तो या तरूणास चिरडून भरघाव वेगाने निघून जात असतांना तलवाडा याठिकाणच्या नागरिकांनी जिवाची बाजी लाऊन हा ट्रक पकडला आहे सदर प्रकरणात पोलिसांनी आपली भूमिका चोख बजवावी व सदोष मनूष्यवधाचा गून्हा यात दाखल करावा आत्तापर्यंत खूप वाळू बळी गेले असून चालकासह मालकालाही या गून्ह्यात आरोपी करावे दिवसा ढवळ्या तलवाडा परिसरातून जानाऱ्या वाळूच्या गाड्या कायदा व सुवैस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत यांची दक्षता वरिष्ठांनी घ्यावी अशी मापक अपेक्षा वरिष्ठ पोलिस उप विभागिय अधिकारी नीरज राजगूरू यांच्याकडून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *