विधिज्ञ श्रीनिवास (आबा)ढाकणे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड
गेवराई दि 17 ( वार्ताहार ) येथील न्यायालयात गेल्या 8-10 वर्षांपासून वकिली करणाऱ्या विधिज्ञ.श्रीनिवास अर्जुन ढाकणे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.विधिज्ञ.श्रीनिवास ढाकणे हे आठ-दहा वर्षांपासून गेवराई न्यायालयात वकिली करत असून अनेक केसेस त्यांनी हाताळल्या आहेत.अनेक प्रशासकीय विभागाच्या केसेस मध्ये त्यांचा चांगला हातखंडा आहे. त्यांच्या या अनुभव व कर्तृत्ववाच्या जोरावर त्यांची भारत सरकारच्या शासकीय नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आसून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.