मुख्याद्यापकाला मारहान करनाऱ्या दोन शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाई
मुख्य कार्यकारी अधिकारी संगिता देवी पाटील यांचा दणका
गेवराई दि 16 ( वार्ताहार ) तालुक्यातील शेकटा जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याद्यापकाला सहकारी शिक्षक यांनी अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच जबर मारहान केल्याची घटना दोन दिवसापुर्वी पाडळशिंगी पुलाजवळ घडली होती या प्रकरणी गेवराई पोलिसांत अनूसुचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अन्य कलमान्वे गून्हा दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी संगिता देवी पाटील यांनी मारहान करणाऱ्या दोन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, संतोष गिरी,व रघूनाथ नागरगोजे,हे दोन शिक्षक हे गेवराई तालुक्यातील शेकटा जिप शाळेत शिक्षक आहेत तसेच याच शाळेतील मुख्याद्यापक अंबादास नारायणकर हे मुख्याद्यापक आहेत कामावरून सतत यांची शाब्दीक चकमक होत असत परंतू वरिल दोन शिक्षक हे आम्ही तूमच्या सारख्या खालच्या पातळीच्या लोकांच्या हाताखाली काम करायचे का?असे म्हणून जातिवाचक शिविगाळ करूण मुख्याद्यापक याला पाडळशिंगी परिसरात या दोन शिक्षकांनी मारहान केली या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल झाला परंतू शिक्षण विभागाचे लत्करे वेशिला टागणाऱ्या या दोन्ही शिक्षकांचे निलंबन मुख्य कार्यकारी अधिकारी संगिता देवी पाटील यांनी केल्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.