दाखल झालेल्या गून्ह्यात 50 पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग
पांडूचोर? यांचे नाव आघाडीवर;दरोड्याचे कलम लावण्याच्या हालचाली?
गेवराई दि 13 ( वार्ताहार ) राक्षसभूवन परिसरातून एक हजार ब्रास वाळू चोरीला गेल्याची फिर्याद आज्ञातावर जरी दाखल असली परंतू महसूल आणि पोलिस प्रशासन 50 वाळू माफियांवर कार्यवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे तसेच या गून्ह्यात पांडूचोर?यांचा देखील सहभाग असनार आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील संपुर्ण गोदापात्राचा पंचनामा तहसिलदार व पोलिस संयुक्त करणार असल्याची माहिती असून यामध्ये 50 पेक्षा जास्त आरोपी विरूद्ध गून्हे दाखल होणार असल्याच्या हालचालीना वेग आला आहे तसेच राक्षसभूवन या ठिकाणा वरूण जी एक हजार ब्रास वाळू चोरीला गेली यामध्ये एकटा पांडूचोर?सहभागी आहे तसेच अन्य ठिकाणाहून वेगवेळ्या ठिकाणी वाळू चोरीला गेली असल्याचे रिपोर्ट गोदाकाठच्या तलाठ्यांनी तहसिलदार संदिप खोमणे यांच्या कडे सादर केले आहेत तसेच राक्षसभूवन वाळू चोरीच्या प्रकरणात पुरवणी जबाब होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे तसेच पोलिस प्रशासनाने याबाबद कठोर भूमिका घेऊन कलम 395 यामध्ये लावावा तसेच या सर्व प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच गेवराईचे कर्तव्यदक्ष पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगूरू यांनी करावा जेनेकरूण वाळू माफियासह पांडूचोर?यांच्या सारखे भूरटे शासनाचा महसूल यावर हात घालण्याची हिमंत करणार नाहीत.
गेवराईचे वाळू तस्करांची गोवा फरारी
शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकून पांडूचोर?यासह अनेक वाळू तस्कर हे गेवराई गोदापात्रातून अवैधरित्या कमवलेला महसूल गोव्याच्या बिचवर तसेच पब,डिस्को यामध्ये उडवत असल्यांच्या रिल्स सोशल मिडीयावर फिरत आहेत.