गेवराई दि 6 ( वार्ताहार ) तालुक्यातील धोंडराईत पत्नीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली असून आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून सदरची घटना ( आज दि 6 मार्च ) रोजी उघडकीस आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, सुनिल निवृत्ती चातूर ( वय 43 वर्ष ) राहणार धोंडराई तालूका गेवराई जिल्हा बीड हा ईसम मयत झाला असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली तसेच घटनास्तळावर पोलिस दाखल झाले तसेच आपल्या नवऱ्याने रात्री दोनच्या सुमारास गळफास घेतला असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली तसेच पोलिसांनी याबाबद संशय आला तसेच त्यांनी सदरील महीलेची एक तास चौकशी केली असता तीने आपले पतीसोबत पटत नाही तसेच प्रॉप्रटीच्या वादातून गळा दाबून जिवे मारले असल्याची कबूली गेवराई पोलिसांना दिली तसेच आरोपी महीला शारदा सुनिल चातूर ( वय 35 वर्ष ) हीला ताब्यात घेतले असून तिच्यांविरूद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सपोनि कोठकर यांनी दिली आहे.