गेवराई दि 29 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिरात तसेच अंबड हद्दीत पांडूसह अनेक वाळू माफियांनी धूमाकूळ घातला होता तसेच यापरिसरात यांची प्रचंड दहशत आहे म्हणून कार्यवाई करण्यास अधिकारी जात नव्हते परंतू गेवराई तालूक्यातील चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल झाल्यानंतर अंबडचे तहसिलदार चंद्रकात शेळके यांना याबाबत गूप्त बातमी दाराने माहिती दिली की पांडू चोरासह याठिकाणाहून अनेकजन वाळू उपसा करतात त्यांनी गोदापात्रात जाऊन गेवराई व अंबड संयूक्त पचंनामा केला अबंड पोलिसांत चौदा जनाविरूद्ध गून्हा दाखल केला असल्याची माहिती अंबडचे तहसिलदार चंद्रकात शेळके यांनी दिली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,वाळू स्टॉक टेंडरच्या नावाखाली राक्षसभूवन येथून आठ ठिकाणावरून बेसूमार वाळू उपसा माफियांनी केला तसेच लाखों ब्रास वाळू यांनी उचलली आहे यापुर्वी यांच्यावर कसलेही कार्यवाईचे हत्यार उपसले नव्हते परंतू अंबडचे तहसिलदार चंद्रकात शेळके यांनी आमच्या हद्दीतून एक हजार ब्रास वाळू उपसली व त्यांची बाजारभाव किंमत 48 लाख रूपये ऐवढी असुन 14 जनावर गून्हा दाखल केला आहे तसेच सदरच्या गून्ह्यात आरोपींची संख्या मोठी आहे तसेच त्यांनी परिसरात दशहशत माजऊन सगळा प्रकार केला आहे त्यामुळे या गून्ह्याच्या कलमात 395 हे कलम लागू शकते अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाकडून आहे तसेच चकलांबा याठिकाणी दाखल असलेलेल्या गून्ह्यात देखील या 14 लोकांचा समावेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे तसेच या गून्ह्यातही 395 कलम लावले जाण्याची दाट शक्यता आहे तसेच या कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत.
या माफियांचा समावेश
1 ) पांडूरंग पोटफोडे 2 ) गूड्डू पोटफोडे,3 ) अजय कोंढरे,4 ) समाधान पोटफोडे,5 ) सचिन नाटकर ,6 ) बंजरंग कोरडे ,7 ) संतोष नाटकर ,8 ) किरण डाके,9 ) शांतीलाल काळे, 10 ) महादेव नाटकर , 11 ) सुरेश नाटकर ,12 ) सुखदेव पोटफोडे ,13 ) विकास पोटफोडे ,14 ) महादेव नाटकर यांचा या गून्ह्यात समावेश आहे.