गेवराई दि 23 ( वार्ताहार ) शहरातील नविन बसस्थानक व जूने बसस्थानक परिसरात एका पत्राच्या शेडमध्ये अनाधिकृत मटका नावाचा जूगार सुरू असल्याची माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांना मिळाली तसेच त्यांनी त्या ठिकाणी पथक पाठऊन छापेमारी करण्याचे आदेश दिले व सदर ठिकाणावरून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे व दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्या पासुन पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी कार्यवाईचा धडका लावला असुन एकाच वेळी चार ठिकाणी मटक्याच्या बूक्यावर छापे पडल्याने मटका माफियाचे धाबे दणानले आहेत तसेच गेवराई शहरात पत्र्याच्या शेडमध्ये जूने बसस्थानक परिसर व नविन बसस्थानक परिसरात हा सगळा प्रकार सुरू होता यांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी आपले पथक रवाना करून याठिकाणावरून चार आरोपी ताब्यात घेत दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच गेवराई पोलिसांत या बाबद गून्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नंदकूमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर,सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ,पोलिस उप निरीक्षक शिवाजी भूतेककर,सहाय्यक फोजदार सुरेश पारधी,सह अन्यजणांनी केली आहे.