सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांची कामगिरी
गेवराई दि 21( वार्ताहार ) मातोरी परिसरातून एकजन अनाधिकृत चंदनाच्या झाड तोडून त्या आतिल गाभा नेऊन विक्री करत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली तसेच त्यांनी मातोरी परिसरात सापळा लाऊन एक पुष्पा जेरबंद केला आहे तसेच या कार्यवाईत एक मोटार सायकल सह 38 हजार 640 रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कोळगाव ते मातोरी रस्त्यावरून एक चंदन तस्कर स्वतःच्या मोटरसायकल वरून एक चंदनाचे झाड तोडून त्याचा सुगंधित बंदी असलेला गाभा घेऊन जाणार आहे त्यानुसार चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह सापळा लावून संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव भारत विक्रम जाधव ( वय 45 वर्ष ) राहणार मिडसांगवी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्याची झडती घेतले असता त्याच्याकडे एका गोणीमध्ये तोडलेले चंदनाचे साडेतीन किलो वजनाचे तुकडे चंदन तोडण्याचे साहित्य एक मोटरसायकल असा 38 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदरचे साहित्य जागीच जप्त करून पोलिस ठाणे चकलांबा येथे आणून गुन्हा रजिस्टर नंबर 41/24 आयपीसी कलम 379, सह कलम 41,42,26 (1)(f) भारतीय वन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार गुरव हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ नीरज राजगुरू,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, पोलिस हवालदार 43 बारगजे, पोलिस शिपाई किरण मिसाळ, पोलिस हवालदार गुजर,यांनी केली.