गेवराई दि 17 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दित टाकळगाव शिवारात सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर पोलिसांची छापा मारला आहे तसेच याठिकाणावरून एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असुन पाच आरोपीना पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.तसेच ही कार्ययाई आज ( दि 17 रोजी )रात्री आठच्या दरम्यान केली आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील टाकळगाव शिवारात वडूमावळ रोडवर अनाधिकृत छनामना जूगारचा खेळ सुरू असल्याची माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांना मिळाली तसेच त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथका समेवत छापा टाकला व त्याठिकाणाहून पाच जूगारी व एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन याप्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी दिली आहे.