April 19, 2025

शिवाजी घरत यांची सुटका

बीड स्थानिक गून्हे शाखेची कामगिरी

 

गेवराई दि 26 ( वार्ताहार ) बीड शहर पोलिसांत काल दूपारी द कुटे ग्रूपच्या अर्चना कूटे यांचे बंधू शिवाजी घरत यांची काही लोकांकडून खंडणीसाठी अपहरण झाली असल्याची घटना बीड शहरात घडली होती तसेच या प्रकरणी गून्हा नोंद करण्यात आला होता तसेच अर्चना कुटे यांना पाच कोटीची खंडणी अपहरणकर्ते यांच्याकडून मागतली होती त्याअंनूषगाने पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर यांनी सदर घटनेचा तपास स्थानिक गून्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता व अवघ्या चोविस तासांत बीड स्थानिक गून्हे शाखेने अपहरण कर्त्या कडून शिवाजी घरत यांची सुटका केली आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की, ( दि 25 रोजी ) दूपारी बीड शहरातून काही लोकांकडून द कुटे ग्रूपच्या अर्चना कुटे यांचे बंधू शिवाजी घरत यांचे अपहरण झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती बीड शहर पोलिसांत या प्रकरणी गून्हा नोंद करण्यात आला होता तसेच काल रात्री आठच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील तलवाडा फाट्यावर दोन आरोपीना स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईल पकडले होते आज सकाळ पासुनच बीड स्थानिक गून्हे शाखेचे पथके आरोपीच्या शोधात होते ( दि 26 रोजी ) दूपारी दोनच्या दरम्यान तलवाडा परिसरात शिवाजी घरत यांना सोडून आरोपी पसार झाले आहेत अशी माहिती आहे तसेच त्यांना सुखरूप बीड स्थानिक गून्हे शाखेच्या टिमने आपल्या सोबत घेतले आहे व पोलिस मागावर असल्याचे कळताच आरोपी पसार झाले आहेत सदरची कामगिरी ही बीड पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर ,स्थानिक गून्हे शाखेचे संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखीली पो उपनि खटावकर,पो उपनि तुपे,पो उपनि मुरकूटे,पो उपनि सुतळे,एएसआय जकताप,एसी, मनोज वाघ,पोहे,ठोंबरे,दूबाले,वाघमारे,कदम,शिंदे,घोडके,यांनी केली असुन त्यांना गेवराई पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष जंजाळ,पिंक पथक प्रमुख सपोनि प्रफूल्ल साबळे,सपोनि कोठकर  यांनी मदतकार्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *