गेवराई दि 18 ( वार्ताहार ) गेवराईचे पोलिस निरीक्षक धंनजय फराटे यांची बीड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर संभाजी नगरला नुकतीच बदली झालेच्या आदेश आयजी कडून निघाले असतांना आता गेवराई पोलिस ठाणे प्रमुख पदासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती असुन पोलिस निरीक्षक संजय लोहकरे व पोलिस निरक्षक प्रविणकूमार बांगर यांची नावे गेवराई पोलिस ठाणे प्रमुखांच्या पदासाठी चर्चेत आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुका नेहमिच क्राईम व अवैध धंद्याचे माहेरघर आहे तसेच याठिकाणी कायदा व सुवेस्थेच्या दृष्टीकोनातून खमक्या अधिकारी याठिकाणी येणे आवश्यक आहे तसेच सन 2011 व 2012 या सालात गेवराई गून्हेगारी विश्वाचं केंद्र होते परंतू या दोन वर्षात गेवराई कर्तव्यदक्ष तसेच शिस्तप्रिय असलेले पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी गून्हेगार याचं कर्दनकाळ म्हणून यशस्वी कार्यकाळ संभाळला होता आजही गून्हेगार त्यांच नाव ऐकलंतर थरकाप सोडतात पुन्हा ऐकदा या ठिकाणी त्यांना पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर संधी देतील का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे तसेच गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठाण्याची धूरा पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी संभाळली आहे तसेच ते देखील गेवराई पोलिस ठाण्यासाठी दावेदार ठरू शकतात अशी देखील चर्चा आहे तसेच येणाऱ्या चार दिवसांत ठाणेप्रमुखांची जबाबदारी पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर देतील तसे आदेश ही नुतन ठाणे प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती असुन बीड जिल्ह्यात गेवराई पोलिस ठाणे चर्चेचा विषय ठरत आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...