April 19, 2025

निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलिस अधिकाऱ्यांचे खादेपालट 

बीड दि.16 ( वार्ताहार )ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संभाजीनगर   ( औरंगाबाद ) परिक्षेत्रातील विविध संवर्गातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केल्या आहेत. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांचा यात समावेश आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातून 13 पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 22 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच अधिकारी बदलण्यात आले आहेत. यात बाळासाहेब पवार (धाराशिव), विश्‍वास पाटील (छत्रपती संभाजीनगर), रवी सानप (धाराशिव), धनंजय फराटे (छत्रपती संभाजीनगर), सलिम चाऊस (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे तर प्रशांत महाजन, मारोती खडकर, उसमान चांदशेख, संजय लोहकरे, प्रविण बांगर यांना बीड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये बीड जिल्ह्यातील 11 एपीआय बदलण्यात आले आहेत. यात केदार पालवे, विजय देशमुख, निलेश इधाटे, योगेश उबाळे, भाऊसाहेब गोसावी, अशोक खरात, संदीप दहिफळे, योगेश खटकर, विलास हजारे, रामचंद्र पवार, कैलास भारती, अमोल गुरले, शंकर वाघमोडे यांचा समावेश आहे तर बीड जिल्ह्यातील 10 पोलीस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून तितकेच पोलीस उपनिरीक्षक बीड जिल्ह्यात आले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये गणपत जागडे, मनिषा गिरी, रवि देशमाने, औदुंबर मस्के, अजित चाटे, रामदास काळे, किरण पवार, संतोष नागरगोजे, संतोष गित्ते, प्रताप गर्जे, वासुदेव पवार यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *