गेवराई दि 7 ( वार्ताहार ) अवैध धंद्यावाल्याची हूजरेगिरी कूठपर्यंत करावी याला एक मर्यादा असते गेवराई तालुक्यात तहसिलदार संदिप खोमणे यांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे रात्री राक्षसभूवन परिसरात शंभर पेक्षा जास्त हायवा भरून चालल्या असल्याची माहिती गेवराईच्या तहसिलदार यांना मिळाली परंतू वेळेवर न जाता एक यादीत नाव नसलेल्या हायवावर कार्यवाई केली असल्याची माहिती असुन अश्या बेजवाबदार आणि कार्यशुन्य तहसिलदार संदीप खोमणे यांच्या कार्यवाई वर संशय व्यक्त केला जात आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील,राक्षसभूवन, गंगावाडी,संगमजळगाव,म्हाळजपिंपळगाव,आंगर नांदूर,याठिकाणा वरून दररोज शभंर पेक्षा जास्त हायवा अनाधीकृत भरून जातात यांची संपुर्ण कल्पना गेवराईच्या महसुल प्रशासनाला आहे मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले हा अवैध वाळू उपसा करणाऱ्या लोकांकडून तहसिलदार संदिप खोमणे यांच्या सांगण्यानुसार,कलेक्शन जमा करतो आणि तहसिलदार संदिप खोमणे पर्यंत पोहचवतो हा किती नालायक पनाचा कळस आहे गेल्या आठवड्यात एका शाळकरी मुलाला एका हायवाने चिरडले ह्या घटनेला काही दिवस लोटत नाही तर पुन्हा गेवराई च्या तहसिलदार संदिप खोमणे यांनी वाळू माफयांना मोकळीस दिली रात्री अकरा च्या सुमारास राक्षसभूवन फाट्यावर यादीत नाव नसलेला हायवा पकडून गेवराईच्या तहसिलदार यांना काय?साध्य करायचे आहे यांची चर्चा संपुर्ण प्रशासनात सुरू आहे तसेच यापुढे एकही व्यक्तीचा जिव वाळूच्या हायवाने गेला तर गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे व मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले वर सदोष मनुषवधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी गोदाकाठच्या नागरिकांकडून होऊ लागली आहे.