रिपाइं युवक तालुका अध्यक्षपदी सय्यद ऐजाज यांची निवड
गेवराई दि 1 ( वार्ताहार ) सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच सर्व परिचित म्हणून त्यांची ख्याती असलेले माजी नगर सेवक सय्यद ऐजाज यांची रिपाइं (आठवले गट ) गेवराई युवक तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड प्रदेश अध्यक्ष तथा रिपाइं बीड जिल्हा अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शिंधी भवन याठिकाणी गेवराई रिपाइं च्या वतिने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच याठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पप्पूजी कागदे यांची उपस्थिती होती तसेच याठिकाणी माजी नगर सेवक ऐजाज यांच्यावर गेवराई तालुका युवक तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली व यांचे नियुक्तपत्र पप्पूजी कागदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी रिपाइं तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर , राजू जोगदंड, गौतम कांडेकर , मुस्ताक कुरेशी ,सुनिल कांडेकर ,विजय सौंदरमल,छगन खरात,बाबासाहेब भोले,यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...