उमापूरमध्ये गूटखा माफिया विरूद्ध अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाई
पंदरा हजाराचा मुद्देमाल जप्त;दोघाविरूद्ध गून्हा
गेवराई दि 10 ( वार्ताहार ) उमापुर परिसरात दोन वेगवेगळ्या गोळ्या बिस्कीटाच्या दूकानात आज ( दि 10 रोजी ) दूपारी अन्न व औषध प्रशासनाच्या वतिने तपासणी करण्यात आली तसेच या दोन्ही दूकानात तंबाखूजन्य गूटखा मिळून आला तसेच चंकलाबा पोलिसांत या प्रकरणी दोघाविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,आज दूपारी उमापूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाचे भरारी पथक गस्तीवर असतांना त्यांना खात्रीलायक सुत्रांनी शेख ईम्राण ईसामियाँ व समिर ईस्माईल शेख हे दोनव्यक्ती आपल्या दूकानात अनाधीकृत कायद्यानुसार कर्करोगजन्य तंबाखू व गूटखा हे विक्रीकरत असल्याच्या माहिती वरूण सदरच्या दोन्ही दूकानात बीड येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांने छापा मारला सदर ठिकाणी ,गोवा,बाबा,हिरा,राजनिवास यासारख्या पंदरा हजार रूपयाचा मुद्देमाल सापडला हा गूटखा कुठून अशी विचारणा केली असता यादोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याठिकाणाहून पलायन केले,तसेच या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक तांगडे हे करत आहेत