मोटार सायकल चोरी करूण त्यांची विल्हेवाट लावणाऱ्याची टोळीचा पर्दाफाश…

 

पोलिस निरीक्षक किशोर पवार यांची मोठी कार्यवाई

गेवराई दि 5 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीत गेल्या कित्येक दिवसापासून चोरीचे प्रकार घडत होते परंतू यामध्ये चोरटे फक्त मोटार सायकल यांची चोरी करत असत तसेच गेवराई शहरातील अनेक मोटार सायकल वाहनाच्या चोरी गेल्याच्या तक्रारी गेवराई पोलिसांत दाखल करण्यात आल्या होत्या याच अनेक गून्ह्याच्या संबंधित तपासात सिसीटिव्ही फूटेज अधारे बीड व संभाजीनगर येथील दोन आरोपींचा समावेश आढळला व नेकनूर मध्ये एका गॅरेजमध्ये हे चोरीचे वाहने यांची विल्हेवाट लावली जात असायची या प्रकरणात गेवराईचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी नेकनूर परिसरात छापा टाकला असता यामध्ये दोन टेम्पो भरून मोटार सायकल व त्यांचे पार्ट असा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिसांत मोटार सायकल चोरी यांचे अनेक गून्हे प्रलंबित होते तसेच यामध्ये गेवराई पोलिसांना सिसीटिव्ही फूटेज अधारे आरोपीचे रॅकेट निष्पन्न झाले तसेच सदर आरोपी हे बीड व संभाजीनगर याठिकाणचे असल्याची माहिती आहे तसेच यांनी गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून 50 पेक्षा अधिक मोटार सायकल चोरी करून नेकनूर याठिकाणी त्यांची विल्हेवाट लावत असत मोटार सायकलची चोरी केल्यानंतर एका दिवसात सदरचे वाहन गॅस कटरने तोडून त्याला स्क्रॅप करत असत एका दिवसात हे पुरावे नष्ट करत असत परंतू वेवगळ्या ठिकाणी चोरी करताना दोन ईसम अनेक ठिकाणी असनाऱ्या सिसीटिव्हीत कैद झाले तसेच गेवराईचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी याच सिसीटिव्ही फूटेज अधारे या आरोपींना बीड व संभाजीनगर याठिकाणा वरून ताब्यात घेतले व नेकनूर या परिसरात विल्हेवाट लावणाऱ्या गॅरेज मध्ये आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला असता सदर ठिकाणी 50 पेक्षा जास्त मोटार सायकल व त्यांचे पार्ट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कार्यवाई बीड पोलिस अधिक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार,सपोनि संतोष जंजाळ,सपोनि दिपक लंके,पोउपनि उबाळे,पोउपनि सुरेश पारधी,पोउपनि पवार, पोटे,दराडे,हंबार्डे,सांगळे,आदिंनी केली आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *