गेवराई दि 25 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील बोरगाव ( बू ) याठिकाणी आज सकाळी दहाच्या सुमारास महसुली पथकाने छापा मारला असता दोन ट्रॅक्टर सह दोन केनी या कार्यवाईत जप्त केले असुन अंदाजे दहा लाख रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, तहसिलदार संदिप खोमणे यांना गूप्त बातमीदारामार्फत बोरगाव ( बू ) याठिकाणी केनीच्या साह्याने अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी सदर ठिकाणी जाऊन गोदापात्रात छापा मारला व दोन केनीसह ट्रॅक्टर या कार्यवाईत जप्त करण्यात आले असुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाई तहसिदार संदिप खोमणे , मंडळ पखाले ,मंडळ आंधळे,तलाठी किरण दांडगे,कोतवाल शूभम गायकवाड यांनी केली आहे.