January 22, 2025

शाखा उघडताना वेगवेगळ्या उघडता आणि अडचणीत आल्यावर एकत्र येता

वारे गेवराईतील मल्टीस्टेट वाल्यांची अलीबाबा चाळीस चोर ची टोळी

लाखो रुपयांचे डिपॉझिट ठेवून घेता व देताना दहा हजार रुपये कसे घ्या म्हणता ?

भाग 1

गेवराई दि 23 (वार्ताहर) बीडच्या साईराम मल्टीस्टेट च्या मुख्य शाखेसह सर्व शाखा दोन दिवसांपासून बंद असल्यामुळे ठेविदार धास्तावले आहेत. याचा फटका अन्य सहकारी संस्था, मल्टीस्टेट व मल्टिपल निधी या संस्थांना बसला असून अचानकपणे ठेवीदार पैसे काढत असल्याने दररोज फक्त दहा हजार रुपये ठेवीदारांना देण्याचा निर्णय गेवराई तालुक्यातील काही मल्टीस्टेट, सहकारी पतसंस्था व मल्टिपल निधीच्या चालकांनी घेतला आहे. या निर्णयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. संस्थाचालकांचा हा निर्णय ठेवीदारांच्या मुळावर उठला असून आमच्याकडून लाखो रुपयांच्या ठेवी ठेवून घेता व आता द्यायची वेळ आली तर दहा हजार रुपये दर दिवशी घेऊन जा असे कसे तुम्ही म्हणू शकता ? अशा संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारातून दिल्या जात असून ठेवीदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच गेवराईतील काही  पतसंस्था अडचणीत आल्या असल्याने गेवराई शहरातील दोन चाणक्य यांनी सगळ्यांची बैठक घेऊन ठेविदारांना कसे? मुर्खात काठायचे यांचे धडे शिकवले असल्याची माहिती आहे तसेच या अलीबाबा चाळीस टोळीचे मनसुबे उघडकीस लवकरच  येणार आहेत.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये कोट्यावधी रुपयांचा आहार झाल्यानंतर मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. याचा फटका इतर पतसंस्था मल्टीस्टेट व मल्टिपल निधी या संस्थांना बसत आहे. त्यातच ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांच्या अडकल्या आहेत. परंतु त्यांना पैसे मिळत नसल्याने ठेविदार अस्वस्थ आहेत. त्यातच बीड येथील नामांकित असलेल्या साईराम मल्टीस्टेट च्या सर्व शाखा अचानक बंद झाल्या व जिल्ह्यात खळबळ उडाली. संस्थेच्या अध्यक्षांनी ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत परंतु वेळ द्या अशा पद्धतीचा व्हिडिओ प्रसारित केला परंतु त्यांचा संपर्क होत नाही शाखा ही बंद आहेत त्यामुळे ठेवीदार धास्तावलेले आहेत.

एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेवराई देखील ठेवीदार धास्तावलेले असल्यामुळे मल्टीस्टेट नागरी सहकारी पतसंस्था व मल्टिपल निधीच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहावयास मिळत आहे. गेवराईतील काही मल्टिस्टेट चालकांनी ठेवीदारांच्या पैशाचा इतरत्र वापर केल्यामुळे या संस्था अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. त्या ठिकाणी ठेवीदारांना एक रकमी ठेवीचे पैसे दिले जात नाहीत. त्यातच काही मल्टीस्टेट मल्टिपल निधी व नागरी सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दररोज ठेवीदारांना फक्त दहा हजार रुपये देण्याचा मनमानी निर्णय घेतल्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आमच्याकडून लाखो रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या व आता द्यायची वेळ आली तर दररोज दहा हजार रुपये घेऊन जा असे कसे तुम्ही म्हणू शकता ? हा निर्णय आम्हाला मान्य नाही अशा संतप्त प्रतिक्रिया ठेवीदारातून दिल्या जात आहेत.तसेच शाखा उघडताना वेगवेळ्या उघडायच्या आणि अडचणीत आल्यावर एकत्र येऊन ठेविदारांना कसे?हाताळयचे व जनतेचा पैसा अडचणीत आला आहे गेवराई शहरातील सुजान नागरिकांनी आपआपल्या ठेवी काढाव्यात नसता तुमच्यावर पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *