मराठा समाजाच्या आंदोलकाना आ लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजिनामा सोपविला

 

गेवराई दि 28 ( वार्ताहार ) मराठा आरक्षण प्रश्न पेटला असुन आज सकाळ पासुनच माजलगाव मध्ये यांचे पडसाद उमटले आहेत आ प्रकाश सोंळूखे यांचा बंगला व गाड्या पेटवल्यानंतर गेवराईत सकल मराठा समाजाने तहसिल कार्यलय व पंचायत समतीला कुलूप ठोकले व मराठा समाजातील काही तरूण यांनी गेवराई आ लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर येऊन घोषणाबाजी केली यानंतर आ लक्ष्मण पवार यांनी आंदोलकाना बोलण्याचा प्रयत्न केला तसेच आंदोलकांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून तुम्ही राजिनामा द्या असे म्हटंल्यानंतर एका क्षणांत आ लक्ष्मण पवार यांनी आंदोलक यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजिनामा सुपुर्द केला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी, मराठा आंदोलन प्रश्न पेटला आहे तसेच मनोज जंरागे यांची प्रकृती चिंताजनक आहे यांची सरकार दखल घेत नाही यांची दखल न घेतल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा आंदोलक यांनी सरकारी कार्यलये, बंद केले आहेत तसेच काही तरूण मराठा आंदोलक यांनी गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली तसेच तुम्ही राजिनामा द्या अशी मागणी केली आंदोलक यांच्याशी आ लक्ष्मण पवार यांनी चर्चा केली आंदोलकांनी राजिनाम्याची मागणी करताच एका क्षणांत आ लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा आंदोलकाकडे आपला राजिनामा सुपूर्द केला आहे.तसेच हा राजिनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पाठविला असल्याची माहिती आहे.

याबाबद चा व्हिडिओ पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिंक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *