बीड दि 28 ( वार्ताहार ) साहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या पथकाची पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लिंबारुई गावात यात्रेमध्ये चालणाऱ्या सुरट जुगारावर धाड मारून नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन एकूण किमती 53,310/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की, मा. पंकज कुमावत साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की मौजे लिंबारुई ता.जि. बीड येथे यात्रेमध्ये काही इसम सुरट नावाचा जुगार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे लावून खेळवीत आहेत, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी यांना सदर ठिकाणी रेड करण्याचे आदेश दिल्याने आज दिनांक 28/10/2023 रोजी 16.00 वाजता मौजे लिंबारुई ता.जि. बीड येथे यात्रेमध्ये बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सुरट जुगारावर कारवाई करून एकूण नऊ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुरट जुगाराचे साहित्या सह एकूण किमती 53,310/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन मिळुन आलेल्या एकुण 09 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पंकज कुमावत साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज यांच्या आदेशाने त्यांच्या पथकातील देशमुख,दिलीप गीते, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, सिद्दिक शाह, राठोड, थापडे, पोटे व अंभोरे यांनी केली आहे