एकाचवेळी पाच जणांविरूद्ध हद्दपारीच्या कार्यवाईमुळे गुन्हेगारात खळबळ
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात आत्तापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने तडपारीचे हत्यार उपसले नव्हते परंतू कायदा व सुवेस्था आबाधित ठेवण्यातसाठी सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत तसेच वाढत्या गून्हेगारीला लगाम लावण्यासाठी गेवराईचे उप अधीक्षक निरज राजगूरू यांनी गून्हेगारी विश्वावर मोठा घाव घातला आहे एकाच वेळी गेवराई तालुक्यातील पाच जणांविरूद्ध मोक्का अंतर्गत कार्यवाई करूण त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याने गेवराई तालुक्यातील गून्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चोऱ्या , जबरी घडफोडी , दरोड्या सारखे गंभीर स्वरूपाचे गून्हे दाखल असलेल्या आणि बीड जिल्ह्यात व ईतर ठिकाणच्या जिल्ह्यात अनेक गून्हे दाखल असलेल्या संजय उर्फ संज्या रामदास पवार राहणार सावरगाव ,संतोष हनूमान धनगर रा गोपाळवस्ती, गेवराई , विशाल बाबासाहेब जाधव ,राहणार म्हाळजपिंपळगाव सांवगी नेवासा,राम भगवान गव्हाणे राहणार गोपाळवस्ती गेवराई ,ज्ञानेश्वर श्रावण माळी ,राहणार गेवराई , राम भगवान गव्हाणे राहणार गोपाळवस्ती,या पाच जणाविरूद्ध मोक्का अंतर्गत कार्यवाई करण्यात आली असल्याने गून्हेगारात भितीचे वातावरण परसले आहे तसेच यांना नगर व बीड जिल्ह्याबाहेर एक वर्षासाठी स्थानबद्द केले आहे उप अधिक्षक निरज राजगूरू यांनी केलेल्या या कार्यवाईमुळे गून्हेगारी विश्वाला मोठी चपराक मानली जात आहे तसेच ही कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर , यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक निरज राजगूरू यांनी केली आहे .