गेवराई दि 18 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात अवैध वाळू उत्खनन करूण ते गाडी भरून देत असल्याची माहिती मिळाल्यावरून गोदापात्रात पोलिस अधिक्षक पथक प्रमुख भास्कर नवले यांनी छापा मारून रोटर ताब्यात घेतले आहे.तसेच ही कार्यवाई आज ( दि 18 रोजी ) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केली आहे .
याबाबद सविस्तर माहिती माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना राक्षसभूवन मध्ये अनाधीकृत वाळू उपसा झालेली वाळू एक रोटर भरूण देत आहे अशी माहिती मिळाल्यावरूण पोलिस अधीक्षक पथक प्रमुख भास्कर नवले यांनी सदर ठिकाणी छापा मारला व एम एच 21 बीव्ही 4845 हा ताब्यात घेऊन 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला व चालक नंदू शिवाजी लहरे ( वय 37वर्ष ) राहणार राक्षसभूवन तालुका गेवराई जिल्हा बीड व मालक राजेंद्र दगडू बोंबले ( वय 45 वर्ष ) राहनार साष्टपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेऊन गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदरची कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख भास्कर नवले , पोहे मदन जगदाळे ,पोह शिवाजी डिसले ,व स्थानिक पोह तूकाराम पौळ यांनी केली आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...