महागौणखनिजची साईट हॅक करूण वाळू माफियांनी वाळू चोरली

आनंद सरपते यांच्या तक्रारीमुळे खळबळ

 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) वाळू तस्कर काय?शक्कल लढवतील यांचा अंदाज नाही कारण असाच वाळू माफियाचा पराक्रम समोर आला आहे तसेच महागौणखनिची साईड हॅक करूण वाळू माफियांनी वाळू चोरली असल्याचा आरोप आनंद सरपते यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केला असल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे याठिकाणी ६०० रुपये प्रति ब्रास वाळू डेपो आहे तसेच याठिकाणच्या गोदापात्रातून वाळू बाहेर काढण्यासाठी १७०० रुपये ब्रास प्रमाणे टेंडर एका खाजगी कंनट्रशनला दिले आहे परंतू यांनी शासनाच्या घालून दिलेल्या अटीचे पालन केले नाही तसेच शासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत वजन काट्याचा सुपष्ट उल्लेख असतांना या कंट्राकदाराने चार हजार ब्रास वाळू बूक केली आहे तसेच ही वाळू वेगवेगळ्या जरी आधारकार्डवरून केली असली तरी याठिकाणी ही वाळू पडलीच नाही तसेच यासंबंधी सर्व वाळू बूक करण्याची चौकशीची मागणी केली आहे तसेच गेवराई तहसिलदार गौणखनिज अधिकारी बीड, राक्षसभूवन मंडळ ,व तलाठी यांची चोकशी होऊन यांना कायमस्वरुपी शासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत आनंद सपरते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *