माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धांसह व्याख्यानाचे आयोजन

गेवराई ( वार्ताहार ) दि. ०८ माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसा निमित्त सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जेष्ठ पत्रकार तथा साहित्यीक दत्तात्रय थोरे यांचे व्याख्यान जयभवानी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर येथे तर मंगळवार दि. १० ऑक्टोंबर रोजी र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एबीपी माझाचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी कृष्णा केंडे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यान आणि वत्कृत्व स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. रजनी शिखरे व प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे यांनी केले आहे.

गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसा निमित्त गेवराई विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्र प्रेमी पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दि. ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद्‌‍ भागवत कथा, भजन संध्या आणि भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर (गढी) येथे सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. सुप्रसिद्ध साहित्यीक तथा वक्ते दत्तात्रय थोरे, सोलापूर यांचे व्याख्यान आयोजित केले असुन यावेळी तरुणांचे नेते रणवीर पंडित हे मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे यांनी केले आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिक्षणमहर्षी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एबीपी माझाचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी कृष्णा केंडे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार असुन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. .बदलते राजकारण बदलती लोकशाही, समान नागरी कायदा, तरुणाईला व्यसनाचा विळखा, बाईपण खरच भारी का देवा ? व नविन शैक्षणिक धोरण हे स्पर्धेचे विषय असणार आहेत. रोख रकमांसह विजेत्यांना सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात येणार आहे. वत्कृत्व स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *