गेवराईत गोकुळ आवतरले, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी !

शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळ्यात भाविक भक्त नाचू लागले आनंदाचे छंदी

गेवराई दि.८( वार्ताहार) माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आयोजित भागलत कथेत आज गोकुळ आवतरले होते. रामकृष्णा हरी जय जय हरी रामकृष्ण हरीचा गजर करत उपस्थित भाविक आनंदाने नाचू लागले..गाऊ लागले. यावेळी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथेप्रसंगी गेवराई शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेच्या पाचव्या पुष्पाला भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केशव महाराज यावेळी म्हणाले कीर्तनात नाचा.. भजनात नाचा..भागवत कथेत नाचा.‌.‌अगदी मनातून आनंदाने आणि भक्तीभावाने नाचले तर देव आपली सेवा करण्यासाठी येतो. कथेत आज गोकूळ, नंदराजा चरित्र, बालकृष्ण आणि शिवशंकर भेट, श्रीकृष्ण लीला, पुतना उद्धार आदी प्रसंग साक्षात उभे केले. कथेची सांगता चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प दिलीप महारज घोगे आणि अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करुन झाली.

सोमवार दि.९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कंठरत्न पंडीत कल्याण गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांचा अभुतपूर्व संतवाणी कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *