गेवराई दि 7 ( वार्ताहार ) तालुक्यातील गुंतेगाव परिसरातील गोदापात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक करूण उत्खनन केली जात असल्याची माहिती बीड पोलिस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे व चकलांबा पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना मिळाली त्यांनी सदर ठिकाणी झापा मारला असता सहा ट्रॅक्टर केनीसह एक ट्रॉली व पाचशे ते सहाशे ब्रास वाळू या कार्यवाईत जप्त केली असल्याची माहिती असुन आज ( दि 7 रोजी ) दूपारी तिन वाजण्याच्या सुमारास ही कार्यवाई करण्यात आली आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गुंतेगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची कुनकून पोलिसांना लागली होती तसेच गूप्त बातमीदाराने ही माहिती पोलिस अधीक्षक पथक प्रमुख साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना देण्यात आली होती सदरचे दोन्ही प्रभारी अधिकारी यांनी आपल्या पथकासोबत दूपारी तिन वाजण्याच्या सुमारास छापा मारला तसेच सहा ट्रॅक्टर व केनीसह एक ट्रॉली साह्याने गोदापात्रात वाळू उपसा सुरू होता तसेच याठिकाणी पाचशे ते सहाशे ब्रास वाळू साठा पडलेला होता तसेच आत्तापर्यंत गुंतेगाव परिसरातील गोदापात्रात ही मोठी कार्यवाई असल्याचे बोलले जात असुन साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व साहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या या कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले असुन या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे असुन चार दिवसापुर्वी राक्षसभूवन या ठिकाणी मोठी कार्यवाई करण्यात आली होती या आठवड्यातील ही दूसरी मोठी कार्यवाई गेवराई तालुक्यात पोलिस प्रशासनाच्या वतिने करण्यात आली आहे .