गेवराई दि 25 ( वार्ताहार ) सध्या उत्साहात चालू असलेल्या गणपती महोत्सव तसेच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद अनुषंगाने तसेच शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित राहणे कामी माननीय वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेवरून चकलांबा पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईचे चांगलेच अस्र उपसले असून चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गुप्त बातमीदार मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री होत असल्याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.यावरूण सदरची कार्यवाई पोलिसांनी केली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की,प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी 4 टीम करून वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकने कामी टीम रवाना केल्या. त्यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 61 हॉटेल गारवाच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये, उकड पिंपरी ते साक्षाळ पिंपरी रोडवरील सिंहगड हॉटेल, चकलांबा येथील हॉटेल सूर्या तसेच राक्षस भवन ते गुळज रोडवरील एका पत्रा शेड वर छापा टाकून आरोपी माऊली रावसाहेब खेडकर रातींतरवणी तिंतरवणी, सचिन बापूराव काशीद रा साक्षाळ पिंपरी, केशव शेषराव खेडकर रा चकलांबा तसेच भगवान मधुकर पाटील रा सुरळेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे एकूण 7925 रुपयाचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर चकलांबा पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायदा कलम 65 इ प्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब बीड, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नीरज राजगुरू साहेब गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर इंगळे, पोह राम बारगजे, पोह खेडकर पोह केदार, पोलीस शिपाई खेत्रे,मिसाळ, सुरवसे, पवळ त्यांनी केली