
वकृत्वाने माणसांच्या आचार-विचाराची जडणघडण होते :- प्रा. सुरेश नवले
वकृत्वाने माणसांच्या आचार-विचाराची जडणघडण होते :- प्रा. सुरेश नवले
गेवराई दि. 2८ 🙁 वार्ताहर ): सहज सुंदर संवादाने वक्ता म्हणून नाव लौकिक करून, विचारवंत होता येईल. मात्र, त्यासाठी स्वतःला वक्तृत्वाची पुजा करता आली पाहिजे. प्रवाही आणि प्रभावी वकृत्वाने माणसाची जडणघडण होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी चौफेर वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी येथे बोलताना केले.शुक्रवार ता. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमीत्त मॅा.संतोषी अर्बन व संस्कृती प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘सहारा बालग्राम’ येथे आयोजित केलेल्या ‘भीमरत्न करंडक’ राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर परमेश्वर वाघमोडे, प्रा.पी.टी.चव्हाण,उत्तमराव सोलाने, शिवाजीराव जाधव, बालग्राम च्या प्रिती संतोष गर्जे यांची उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या स्पर्धेत पुणे येथिल कु. आश्विनी जयराम टाव्हरे हिने प्रथम क्रमांकाचे रोख रू.११ हजार रूपये व भीमरत्न करंडक पटकावला. सातारा येथिल कु.मिथुन दत्तात्रय माने यांनी द्वितीय पारितोषिक रू.७ हजार रु ,सन्मानचिन्ह पटकावले. नाशिक येथिल कु.श्रुती बोरस्ते यांनी तृतीय पारितोषिक रू.५ हजार रु. सन्मानचिन्ह पटकावले.
मुंबई येथील कु.यश पाटील, सांगोल्याचा कु.प्रसाद लोखंडे व बीड येथील कु. आर्या चौथाईवाले यांनी अनुक्रमाने कै.विश्वनाथराव खंडागळे स्मृती पारितोषिक, स्व.बब्बुभाई बारूदवाले स्मृती पारितोषिक व स्व.आदित्य कुलकर्णी स्मृती पारितोषिक पटकावले. उर्वरीत सहा उत्तेजनार्थ पारितोषिकांचे कु.कोमल मस्के, कु.ऋतुराज काकडे,कु.पुनम धुताडमल,कु.संतोष शिंदे, कु.राम जाधव व कु.तेजस्विनी केंद्रे स्पर्धचे मानकरी ठरले. प्रा. नवले यावेळी बोलताना म्हणाले की,
माणुस आयुष्यभर धडपड करून, स्वतःच्या “टारगेट” साठी प्रयत्न करत असतो. राजकीय नेत्यांचे टारगेट विधानसभा, लोकसभा असते, तसे वकृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे टारगेट बक्षीस असते. अशा टारगेटचा पाठलाग करताना मात्र माणुस स्वानंद सुखाला मुकतो, हे वास्तव असले तरी त्याकडे दुर्लक्ष होते, असे ही प्रा. नवले यांनी सांगितले. स्पर्धेत विजेतेपद पटकावणे, यश मिळवणे तसे कठीणच काम आहे. त्यासाठी जिद्दीने भाग घेतला पाहिजे. अभ्यास, टिपणे काढली पाहिजेत. आपल्या पिढीच्या आधीच्या वक्त्यांनी भाषणे ऐकली पाहिजे. पाठांतरा शिवाय मनमोकळ व्यक्त होता, याकडे लक्ष दिले पाहिजे. वकृत्व हे जडणघडणीचे उत्तम माध्यम आहे, असे सांगतांना प्रा. नवले यांनी आठवणींना उजाळा दिला. आचार्य अत्रे, तत्वज्ञ ओशो, यशवंतराव चव्हाण, आचार्य शिवाजीराव भोसले यांचे भाषणे वाचली. भोसले सरांचे भाषण ऐकण्यासाठी औरंगाबाद च्या सभू महाविद्यालयात आपण दुचाकीवरून भरपावसात गेल्याचे सांगून, वाचनाची भूक नव्या पिढीतील युवकांना विचाराच्या नव्या वाटा दाखवते. शब्द अद्भुत रम्य आनंद देतात. या ग्लोबल मार्केट च्या जगात शब्दाशिवाय काय आहे ? असा सवाल उपस्थित करून प्रा. नवले यांनी शब्द म्हणजे कान नाक आणि जीभ, हे त्रिदल असल्याचा उल्लेख ही प्रा. सुरेश नवले यांनी शेवटी बोलताना केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन संजय भालशंकर, संयोजन समीतीचे सदस्य विनोद सौंदरमल, ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, पत्रकार भागवत जाधव, शैलेश जाजू, आण्णासाहेब राठोड, उद्धव मडके, किशोर सोनवणे, सुनील मुंडे, संतोष सुतार, पंकज पाटेकर, प्रा.आर.आर.उगले, प्रा.नरेश घुंगरड यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गिरी यांनी केले.
सुत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. आभार मां संतोषी अर्बन बँक चे अध्यक्ष संतोष भालशंकर यांनी व्यक्त केले.