गौणखनिज अधिकारी माधव काळे यांच्यामुळे वाळू माफियाना अच्छे दिन
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी राज्याचे महसुलमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राक्षसभूवन ( शनिचे ) याठिकाणी नऊ हजार ब्रास वाळू साठा डेपोचे अनावरण करण्यात आले परंतू उदघाटनाच्या दिवशीच बीड येथील गौणखनिज अधिकारी माधव काळे यांच्या आशीर्वादाने ही सगळी वाळू माफियांनी बूक केली असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की , या उदघाटन डेपोच्या अनावरण दिवशी नऊ हजार वाळू ब्रास च्या डेपो पैकी पहिल्या दिवशी 3900 ब्रास वाळू जनतेसाठी खूली करण्यात आली होती मात्र त्यानंतर सदरील वाळू डेपो 994 ब्रास वाळू स्टॉक करण्यात आली त्यापैकी 817 ब्रास वाळू काही लोकांनी संगणमत करूण गौणखनिज अधिकारी माधव काळे यांनी आपल्या मर्जिने होल्ड केव्हाही लाऊन तसेच होल्ड उघडले की यांची माहिती वाळू माफियांना देऊन तात्काळ बूक करण्याचे सांगत असल्याची माहिती आहे तसेच आजही आम्ही संबंधीत शौर्य कंपनीला विचारना केली असता 177 ब्रास वाळू शिल्लक आहे तसेच या बद्दल गौणखनिज अधिकारी माधव काळे यांना विचारना केली असता त्यांनी वाळू साठा शिल्लक नाही असे उडवाउडविचे उत्तर दिले परंतू गौणखनिज अधिकारी जनतेसाठी आहेत की ? वाळू माफियासाठी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे तसेच गौणखनिज अधिकारी माधव काळे यांनी गेवराई तहसिल कार्यलयात प्रदिर्घ काळ सेवा केली असल्याने याठिकणची त्यांना माहिती आहे व सर्व वाळू माफिया यांच्याशी मैत्रीपुर्ण संबंध असल्याने जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्यांचा पदभार काढावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...